Posts

राजकुमारी

 जंगलात एक राक्षस होता  पण भुलवणारा होता राजकुमारी त्याच्या जाळ्यात अडकली वेदना आणि त्रासात जगत एक बाळ ही झालं बाळाला घेऊन राजकुमारी दूरदेशी गेली रोज रात्रीचा दिवस करून बाळ मोठं केलं पण दिवस कसा ही जातो पण काळोखी रात्र जात नाही  चंद्राच्या उजेडात राजकुमारी आज ही माणुसकी चा चंद्र शोधत राहते 1 सर्व उजेड चंद्र नसतात सर्व वाटा ध्येय नसतात  राजकुमारीला मायेची फुंकर मनाला आधार देणारी पहाट अजून उगवली। नाही समुद्र असून शेजारी तहान काहीं भागली नाही  राजकुमारी अशी कधीच नव्हती जंगलात मात्र आता सगळं शिकली हत्यारं आणि बिना हत्यारं घेऊन जगण्याचं तंत्र शिकली मला मात्र जंगल नवीन होतं मी राजकुमारीला शोधत होतो मला दिसत होती पण राजकुमारीला मी दिसत नव्हतो कारण माझ्याकडे तंत्र नव्हते राजकुमारीने जग पाहिलं ते निष्ठुर निर्लज्ज आणि राजकुमारी ही झाली तशी कठोर एकेकाला पुरून उरणारी आधी तर कोमल होती कोणाला न बोलणारी कळी होती इवलीशी स्वप्न घेऊन जगणारी परी होती राजकुमारीला दगड भेटले ती ही दगड झाली करूण दयाळू हृदयाची आता पाषाण झाली लात मारून दगडातून पाणी काढण्याची कला एवढी...