राजकुमारी
जंगलात एक राक्षस होता
पण भुलवणारा होता राजकुमारी
त्याच्या जाळ्यात अडकली
वेदना आणि त्रासात जगत एक बाळ ही झालं
बाळाला घेऊन राजकुमारी दूरदेशी गेली
रोज रात्रीचा दिवस करून बाळ मोठं केलं
पण दिवस कसा ही जातो पण काळोखी रात्र जात नाही
चंद्राच्या उजेडात राजकुमारी आज ही माणुसकी चा चंद्र शोधत राहते 1
सर्व उजेड चंद्र नसतात
सर्व वाटा ध्येय नसतात
राजकुमारीला मायेची फुंकर
मनाला आधार देणारी पहाट अजून उगवली। नाही
समुद्र असून शेजारी
तहान काहीं भागली नाही
राजकुमारी अशी कधीच नव्हती
जंगलात मात्र आता सगळं शिकली हत्यारं आणि बिना हत्यारं घेऊन
जगण्याचं तंत्र शिकली मला मात्र जंगल नवीन होतं
मी राजकुमारीला शोधत होतो मला दिसत होती पण राजकुमारीला मी दिसत नव्हतो
कारण माझ्याकडे तंत्र नव्हते
राजकुमारीने जग पाहिलं ते निष्ठुर निर्लज्ज आणि राजकुमारी ही झाली तशी कठोर एकेकाला पुरून उरणारी
आधी तर कोमल होती
कोणाला न बोलणारी कळी होती इवलीशी स्वप्न घेऊन जगणारी परी होती
राजकुमारीला दगड भेटले ती ही दगड झाली
करूण दयाळू हृदयाची आता पाषाण झाली लात मारून दगडातून पाणी काढण्याची कला
एवढीच तिची कमाई
मी रोज राजकुमारीच्या जुन्या रस्त्यावर जातो
मी राजकुमारी शोधत होतो मला दिसत होती पण राजकुमारीला मी दिसत नव्हतो
कारण माझ्याकडे तंत्र नव्हते
इवलीशी कोवळीशी पोरगी
शोधत राहतो जंगलात
पण इथं तर शिकारी जास्त होते जंगलात शिकार फक्त राजकुमारी होती
मी हत्यारं घेतली शेवटी पण राजकुमारी देखील शिकारीच्या
खेळात रममाण झाली होती
जंगलाचा एक नियम असतो
जगायचं तर शिकार करून च
राजकुमारीचं एक जंगल होतं
खूप सुंदर पक्षी आणि धरण त्यात
पक्षाची किलबिल आणि चिवचिवाट
एक टुमदार घर आणि वळणदार रस्ता राजकुमारीचे गर्द केस म्हणजे ढग
ओठ म्हणजे फुलांच्या पाकळ्या
हाताची बोटे म्हणजे वेल
खोल दुःख घेऊन खुश राहणारे डोळे म्हणजे
राजकुमारीचे आशेचे किरण त्या किरणात माझे प्रतिबिंब
नशिबाचे खेळ मी राजकुमारीत तर नव्हतो, मग का
राजकुमारी माझ्या मनात आली
का मी राजकुमारीत गेलो मला न कळले
बेभान चालत पळत आहे
पाय ठेचाळत आहेत, बोटे रक्ताळली विरह चे दुःख किती अवघड
सी एम माने
Comments
Post a Comment